Anil Thatte on Ajit Pawar : अजितदादांना महायुतीत भवितव्य आहे की नाही? अनिल थत्ते यांनी स्पष्टपणेच सांगितले…

| Updated on: Jun 10, 2024 | 3:59 PM

Anil Thatte Big Prediction after Lok Sabha Election result 2024 : भाजपकडून अजित पवार गटाला एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली. कारण अजित पवार गटाची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी होती. पण अजित पवार यांच्यात उन्मतपणा आहे...

Follow us on

मोदींच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीच संधी मिळालेली नाही त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितेल की, भाजपकडून अजित पवार गटाला एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली. कारण अजित पवार गटाची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी होती. दरम्यान, यासंदर्भातच राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि भविष्कार अनिल थत्ते यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अजित पवार यांच्यात उन्मतपणा आहे, त्यांना प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद द्यायचे होते. सुनील तटकरे यांना भाजपकडून राज्य मंत्रिपदाचा कारभार देण्यात येत होते. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली. त्यांनी त्यांच्या पक्षात आपत्ती ओढून घेतली आहे. त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुतीमध्ये अजित पवार गटाला भवितव्य नाही. मान ना मान मैं तेरा मेहमान म्हणून चिटकून आहेत. उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही’, असे अनिल थत्ते यांनी म्हटले.