‘गुलाबी जॅकेट’ वरून प्रश्न विचारताच अजितदादा पत्रकारांवर भडकले, तुला काही त्रास होतोय…
अजित पवार यांनी आपल्या दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच विरोधकांकडून अजित पवारांकडून गुलाबी कॅम्पेन चालवलं जातंय का? असा सवाल केला जात आहे. इतकंच नाहीतर अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवरूनही सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट घालण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका केल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भातच पत्रकारांनी थेट अजित पवार यांना सवाल केला असता दादा पत्रकांवरच भडकल्याचे पाहायला मिळाले. ‘तुला काही त्रास होतोय.. मला व्यक्ती स्वातंत्र आहे. मला काय घालायचं त्याचा मला अधिकार नाही का? मी माझ्या पैशानी घालतो.. तुमच्या पैशांनी घालतो का? जे कॉमन मॅन घालतो तेच मी घालतो..’, असं अजित पवार म्हणाले तर मी माझ्या पैशाने पिंक जॅकेट घातलं. मी काय घालायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे योग्य वाटतं तेच मी करतो, असं अजितदादा म्हणाले. तर अजितदादा रोज गुलाबी जॅकेट घालत आहेत. यामागे राज्याचं राजकारण गुलाबी करण्याचा त्यांचा हेतू दिसत आहे. पण तसं होणार नाही, असं सांगतानाच जॅकेट घालून राजकारण होत नसतं, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला होता. त्यावरही अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.