Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ महाराष्ट्रात टिकणार की नाही? योजनेबद्दल स्पष्टच बोलले अजित पवार
लाडकी बहीण योजनेवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना अजित पवार यांनी ट्वीट करत चांगलंच फटकारलं आहे. 'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे....'
लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात टीकणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी करत अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांना अजित पवार यांनी ट्वीट करत चांगलंच फटकारलं आहे. ‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तर ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये असल्याचेही दादांनी म्हटले आहे.