८० वय झालं तरी माणूस… शरद पवार यांच्या वयावरून अजित पवार यांचा नाव न घेता निशाणा, काय केलं भाष्य?
८० वय झालं तरी माणूस रिटायर्ड होईना...८४ वय झालं तर तुम्ही थांबना...असे काय चाललंय काय? असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना विचारला. पुढे अजित पवार असेही म्हणाले की, आम्ही आहोत ना करायला, काही चुकलं तर सांगाना आम्हाला...
कल्याण, ७ जानेवारी २०२४ : काही वयाच्या नंतर थांबायचं असतं. वर्षांनुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे. परंतु, काही जण ऐकायलाच तयार नाही. ८० वय झालं तरी माणूस रिटायर्ड होईना…८४ वय झालं तर तुम्ही थांबना…असे काय चाललंय काय? असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना विचारला. पुढे अजित पवार असेही म्हणाले की, आम्ही आहोत ना करायला, काही चुकलं तर सांगाना आम्हाला…आमच्यात तेवढी धमक आणि तेवढी ताकद आहे. कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला त्यावेळी अजित पवार यांनी भाषण केलं. तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्या वयावर भाष्य केलं. तर शरद पवार यांच्या वयावर टीका करत केलेल्या अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केलाय. बापाला कधी रिटायर्ड करायचं नसतं. बाप हे घरातलं ऊर्जास्त्रोत असतं. आई-बापाविना घर सुनंसुनं असतं, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.