Ajit Pawar : ‘तू गप्प बसं.. ते नेहमीसारखं उशीर…’, शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची मिश्किल टोलेबाजी

| Updated on: Dec 08, 2024 | 12:24 PM

विधान भवन परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सगळे सदस्य सभागृहात जाणार होते, असे नियोजन करण्यात आले होते. उपमुख्यंत्री अजित पवार यांचे विधानभवनात आगमन होताच ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने जात असताना त्यांना महाजनांनी रोखलं...

उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात येताच ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यास जात होते. मात्र यावेळी भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना थांबवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत, आपण एकत्र हार घालू असं सांगितलं. यावर एकनाथ शिंदे कुठे आहेत? अजित पवार यांनी कधी येत आहेत ते? असा सवाल केला. तर नेहमी सारखंच लेट येतील ते, अजून वर्षावर आहेत, असं म्हटल्यानंतर एकच हशा पिकला. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेनेचे आमदार भगवे फेटे बांधून आले होते. तर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार गुलाबी फेट्यात दिसलेत. विधान भवन परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सगळे सदस्य सभागृहात जाणार होते, असे नियोजन करण्यात आले होते. उपमुख्यंत्री अजित पवार यांचे विधानभवनात आगमन होताच ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने जात असताना गिरीश महाजन यांनी त्यांना थांबविले. यानतंर अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना कोपरखळी लगावल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Dec 08, 2024 12:23 PM
‘किमान तुम्ही तरी जनतेची दिशाभूल करू नका; पराभव स्वीकारला तर…’, फडणवीसांनी पवारांना थेट दिला दाखला
Sharad Pawar : ‘सांगा काय चुकलं?,’ देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल