भर भाषणात अजित दादा चुकले… रक्षाबंधनऐवजी म्हणाले भाऊबीज अन् ‘लाडकी बहीण’ऐवजी…

| Updated on: Aug 15, 2024 | 12:53 PM

श्री क्षेत्र आळंदी येथे पद्मशाली पंच कमिटीच्या वतीनं पद्मशाली समाज धर्मशाळेचा भव्य असा उद्धाटन सोहळा काल उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित हेते. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी भर भाषणात अजित दादा चुकले..

सध्या राज्यात एकच चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना….राज्य सरकारकडून ज्या दिवशी या योजनेची घोषणा करण्यात आली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यातील काना-कोपऱ्यातील महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी होण्यासाठी एकच पळापळ करताना दिसतेय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असून आतापर्यंत आलेल्या अर्जाची छाननी झाल्यानतंर १७ ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे ३ हजार रूपये महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, एका कार्यक्रमातील भाषणात बोलत असताना अजित पवारांनी ‘लाडकी बहीण‘ऐवजी लेक माझी लाडकी असा उल्लेख केला तर रक्षाबंधनऐवजी अजित पवार यांनी भाऊबीज या सणाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Published on: Aug 15, 2024 12:53 PM