अजित पवार यांना ‘घड्याळ’ वापरायचे असेल तर… कोर्टानं घातल्या अटी, बघा नेमके काय म्हटले?
कोर्टाने अजित पवार यांना सूचना देताना असे म्हटले की, घड्याळ या चिन्हाबाबतच प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. अशी नोटीस हिंदी, मराठी आणि इंग्रजी प्रसिद्धीस द्या. नोटीस मध्ये घड्याळ चिन्हासंदर्भातील प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याचे नमूद करा
मुंबई, २१ मार्च २०२४ : अजित पवार यांना राष्ट्रवादीचं चिन्ह तर मिळालं मात्र अद्याप हे प्रकरण कोर्टात असल्याने घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असे लिहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोर्टाने निवडणूक आयोगाचेही कान टोचले आहे. दरम्यान कोर्टाने अजित पवार यांना सूचना देताना असे म्हटले की, घड्याळ या चिन्हाबाबतच प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. अशी नोटीस हिंदी, मराठी आणि इंग्रजी प्रसिद्धीस द्या. नोटीस मध्ये घड्याळ चिन्हासंदर्भातील प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने ते वापरावं की नाही हे कोर्ट ठरवेल असं नमूद करा. शिवाय पक्षाची जाहीरात बॅनर, पोस्टरवर घड्याळ चिन्हाच्या वापराच्या वेळी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याच्या सूचना अजित पवार यांना दिल्या आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाकडून एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांनी स्थापन केला. अनेक ठिकाणी घड्याळ म्हणजे शरद पवारांचा पक्ष असे मानले जाते. बघा आणखी काय म्हटले होते शरद पवार गटाच्या याचिकेत….