मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही अजित पवार आपल्या जुन्या भूमिकांवर ठाम आहेत. मुस्लीम आरक्षणाबाबत अजित पवार भाजप आणि शिंदे गटाशीही चर्चा करणार आहेत. अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र आपल्या जुन्या भूमिका सोडण्यास ते तयार नाहीत. त्याचीच एक झलक आहे, मुस्लीम आरक्षण. महाराष्ट्रात मुस्लीमांना आरक्षण देण्यासाठी अजित पवार आग्रही असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय.2014मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं मुस्लीम समाजाला आरक्षणाची घोषणा करत निवडणुकीच्या तोंडावर थेट अध्यादेशच काढला होता. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लीम समाजाला 5% आरक्षणाची घोषणा तत्कालीन आघाडी सरकारनं केली होती. मात्र मुंबई हायकोर्टानं नोकऱ्यांमधलं आरक्षण फेटाळलं, पण शिक्षणातलं 5% आरक्षण फेटाळलं नाही पण अद्याप शिक्षणासाठीही मुस्लिमांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता अजित पवारांनीही मुस्लीम आरक्षणासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट