Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले…

| Updated on: Nov 20, 2024 | 11:44 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपुरात दाखल होत त्यांनी सहकुटुंब मतदानकेंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य बजावलं. यंदाही देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. आज सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपुरात दाखल होत त्यांनी सहकुटुंब मतदानकेंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य बजावलं. यंदाही देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केलं. ते म्हणाले, सर्वांनी मतदान आवश्य करा. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडून अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो, त्याला त्या अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर सर्वांनी भरभरून मतदान करावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केलं. तर यंदा महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोर आव्हान असणार आहे. त्यामुळे २३ तारखेला निकाल काय येणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

Published on: Nov 20, 2024 11:41 AM
नाशकात तुफान राडा, सुहास कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील मतदान केंद्रावर कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य