देवेंद्र फडणवीस अन् सुधीर मुनगंटीवार यांना धमकी; सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल
राजुरा येथे राहणाऱ्या, विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या मस्की दाम्पत्याने देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमकी दिली. सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची बातमी समोर यआली आहे. सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याकडून ही धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मस्की या दाम्पत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजुरा येथे राहणाऱ्या, विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या मस्की दाम्पत्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी या दाम्पत्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
Published on: Nov 21, 2023 04:50 PM