Nagpur Violence Video : कबरीचा वाद जाळपोळीपर्यंत, नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; ‘सर्वांनी…’

| Updated on: Mar 18, 2025 | 10:49 AM

औरंगजेबची प्रतिकात्मक कबर जाळल्याच्या आंदोलनानंतर हा तणाव निर्माण झालेला होता. या तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलेली आहे.

नागपूरच्या महाल परिसरात काल राडा आहे. या दोन गट समोरासमोर आल्यानंतर त्याच्यातील वाद चांगलाच पेटला. शहरातील तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून या परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी 144 कलम सध्या नागपूरमध्ये लागू केलं असल्यामुळे तणावपूर्ण शांतता संपूर्ण नागपूरमध्ये आहे. दरम्यान 50 पेक्षा अधिक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. दरम्यान, पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या संपूर्ण नागपूर शहरांमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. कलम 144 लागू असल्यानेच कोणीही एकत्रित येऊ नये, घराबाहेर अनावश्यक फिरू नये, असं आवाहन देखील पोलिसांकडून केलं जात आहे. शहरातील राड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेच आवाहन करत घडलेली घटना चुकीचे असल्याचे म्हटलंय. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं असं आवाहन फडणवीस केले. तर दंगे करणाऱ्यांवर कडक कारवाई कऱण्याच्या सूचना देखील यावेळी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्यात. पुढे ते असेही म्हणाले, नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुख:त सहभागी होणारे शहर आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

Published on: Mar 18, 2025 10:49 AM
Nagpur Violence Video : नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
Toll Tax Rate Hike Video : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून प्रवास करताय? 1 एप्रिलपासून टोल महागणार, एकेरी प्रवासाला ‘इतक्या’ रूपयांची वाढ