Devendra Fadnavis : शरद पवारांमुळे 2019 ला राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीसांचा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘100 टक्के खरंय… ‘

| Updated on: Nov 18, 2024 | 1:03 PM

'राज्यपालांनी जेव्हा राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यासाठी पत्राद्वारे विचारलं. तेव्हा त्याचं उत्तर माझ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर ड्राफ्ट झालं. मग ते पत्र अजित पवारांनी शरद पवारांकडे पाठवलं', देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राष्ट्रपती राजवट शरद पवारांच्या पत्रामुळे लागू झाली अशी चर्चा होतेय. दरम्यान, tv9 मराठीवर आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘100 टक्के खरंय… ‘ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केले. आमची जी एकत्र बैठक झाली ती शरद पवार यांनी मान्य केली. या बैठकीत असं ठरलं की थोडा वेळ घालवायचा. म्हणजे मग राष्ट्रपती राजवट लावता येते. राज्यपाल प्रत्येक पक्षाला विचारतात की तुम्हाला सरकार स्थापन करायचं आहे का? सगळ्यांनी नकार दिला तरच मग त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येते. पवारसाहेबांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही नाही म्हटलं तर शिवसेना एकटी सरकार स्थापन करू शकणार नाही. आम्ही नाही म्हटलं तर काँग्रेस सरकार स्थापन करू शकणार नाही. एकदा राष्ट्रपती राजवट लागली की मी महाराष्ट्र दौरा करून येईल मग मी घोषणा करेल. तेव्हा मी सांगेन महाराष्ट्राचं मत आहे की आपल्याला स्थिर सरकार हवं आहे. म्हणून मग आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मग आपण सरकार स्थापन करू, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. बघा नेमकं काय म्हणाले?

Published on: Nov 18, 2024 01:03 PM
Devendra Fadnavis : ‘…त्यांच्या पाय चाटण्याला भाजपचा आक्षेप’, देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर भडकले अन् दिलं थेट प्रत्युत्तर
Devendra Fadnavis : ‘…तर त्यात चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो’, बटेंगे तो कटेंगेवरून फडणवीसांचा घणाघात