अमरावती लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाची गोची? फडणवीसांनी केलं मोठं विधान

| Updated on: Mar 20, 2024 | 6:38 PM

'नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भाजप सोबत राहिल्या आहेत. पाच वर्षे त्यांनी लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजप आणि मोदींची बाजू मांडली आहे. शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंट्री बोर्ड आणि निवडणूक कमिटी घेईल.', फडणवीसांनी केलं मोठं विधान काय?

Follow us on

अकोला, २० मार्च २०२४ : देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबतचं मोठं विधान करत अमरावतीची जागा भाजपच लढणार असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाने महायुतीत ही जागा गमावल्याचं पक्क झालं आहे. अमरावती लोकसभेची जागा भाजप लढेल. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा तिथल्या विद्यमान खासदार आहे. नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भाजप सोबत राहिल्या आहेत. पाच वर्षे त्यांनी लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजप आणि मोदींची बाजू मांडली आहे. शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंट्री बोर्ड आणि निवडणूक कमिटी घेईल. त्याबद्दल यापेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आनंदराव अडसूळ यांच्याबाबत बोलताना पुढे फडणवीस म्हणाले, ज्या ठिकाणी भाजपला जागा सुटेल, त्या ठिकाणी शिवसेनेने काम करायचं आहे. जिथे शिवसेनेला जागा सुटेल, तिथे आम्ही त्यांचे काम करायचं आहे. जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी काम करायचं आहे, असं सांगत फडणवीस यांनी आनंदराव आडसूळ यांच्यावर बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले आहे.