Ladki Bahin Yojana : एका घरात किती महिलांना मिळणार ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ? फडणवीसांची मोठी माहिती

| Updated on: Jul 03, 2024 | 5:23 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गंत सरकारने काही मोठे बदल केले आहे. याची माहिती सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच एका घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका किती जणांना मिळणार याचीही माहिती फडणवीस यांनी दिली. बघा व्हिडीओ

राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्यात. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी महत्त्वकांक्षी योजना नुकतीच जाहीर केली. या योजनेंतर्गंत सरकारने काही मोठे बदल केले आहे. याची माहिती सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या योजनेत झालेले बदल सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले आहे. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांना सरकारकडून 1500 रूपये सरकारकडून देण्यात येणार आहे. तर या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. तसेच या योजनेत मुदतवाढ देण्यात आली असून आता 31 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तर 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलैपासून दर माह 1500/- रूपये आर्थिक लाभ मिळणार आहे.’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच एका घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका किती जणांना मिळणार याचीही माहिती फडणवीस यांनी दिली.

Published on: Jul 03, 2024 05:23 PM
Ladki Bahin Yojana : पोर्टल अपडेट नाही, नोटिफिकेशन नाही, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन बोजवारा
Ladki Bahin Yojana 2024 : महिलांच्या धावपळीनंतर ‘लाडकी बहीण योजने’त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?