विधिमंडळाच्या आवारातील ‘जोडे मारो’ आंदोलनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
VIDEO | विधिमंडळाच्या आवारात जोडे मारो आंदोलनावर अजित पवार भडकले, तर देवेंद्र फडणवीस आक्रमक होत म्हणाले...
मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी आज विधानसभेत गदारोळ केला. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपसह शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसर आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदारांनी केलेल्या कृतीवर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजिप पवार यांनी सुनावले तर पवारांच्या मुद्यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत पवारांच्या भूमिकेला समर्थन दिलं आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. ‘वीर सावरकरांबद्दल चुकीचं बोलतात, त्याचा निषेध झाला पाहिजे. आम्हीही त्याचा निषेध करतो. यासह विधिमंडळाच्या आवारात अशाप्रकारे जोडे मारो आंदोलन करू नये. मी सत्तारूढ पक्षाच्या वतीने अध्यक्षांना अश्वस्त करतो की, अशाप्रकारे सभागृहाच्या आवारात कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन केले जाणार नाही आणि ते योग्य नाही.’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.