तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या भाजपप्रवेशावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'माझी इच्छा नव्हती पण वरिष्ठाच्या सूचना आल्यात आणि मी भाजपात प्रवेश केला. मी स्वत:हून भाजपमध्ये प्रवेशासाठी विनंती केली नव्हती. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला भाजपमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. त्यानंतर मी भाजपच्या नेत्यांची दिल्लीत भेट घेतली. ', खडसेनी भाजप पक्ष प्रवेशावर भाष्य केले.
‘भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला भाजपमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. त्यानंतर मी भाजपच्या नेत्यांची दिल्लीत भेट घेतली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची प्रक्रिया झाली. परंतु त्यानंतर राज्यातील भाजप नेते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझ्या भाजप प्रवेशाला विरोध झाला. त्यामुळे माझा भाजप प्रवेश रखडला.’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना राज्यातील दोन बड्या नेत्यांची नावं घेत त्यांनी माझा भाजप प्रवेश रोखला असं स्पष्ट सांगितले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात घेतलेला केंद्रीय नेतृत्वातील निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करून गणेशोत्सवानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय केला जाईल’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.