पुराव्याशिवाय मी बोलत नाही, सर्व ऑडिओ-व्हिडीओ माझ्याकडे अन् वेळ आली तर…फडणवीसांचा इशारा कोणाला?
मी आजपर्यंत बललो नव्हतो, पण आज स्पष्टपणे सांगतो...विरोधक सातत्याने आरोप करत आहेत. तरी मी शांत आहे. कारण असं मला राजकारण जमत नाही. पण मी कोणाच्या नादी लागत नाही पण लागलं तर मी त्यांना सोडत नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलाय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या आरोपांवर उत्तर देतांना अनेक विषयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी आजपर्यंत बललो नव्हतो, पण आज स्पष्टपणे सांगतो…विरोधक सातत्याने आरोप करत आहेत. तरी मी शांत आहे. कारण असं मला राजकारण जमत नाही. पण मी कोणाच्या नादी लागत नाही पण लागलं तर मी त्यांना सोडत नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांसह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलाय. तर ‘मी स्पष्टपणे सांगतो कारण त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिजवल मला आणून दिले आहेत. त्या ऑडिओ व्हिडीओमध्ये ते शरद पवार, उद्धव ठाकरे, वाझेवर काय बोलताय ते सगळं माझ्याकडे आहे. जर माझ्यावर वेळ आली तर मी ते सार्वजनिक करावं लागेल. रोज जर कोणी खोटं बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावे मी पुराव्य़ाशिवाय काहीही बोलत नाही.’, असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांची केस २०१३ ची केस आहे. याआधीच त्यांचं अजामीनपात्र वॉरंट निघालं. पण तारखेवर हजर राहिलं तर ते रद्द होते. पुन्हा ते त्या तारखेला गेले नाही तर त्यांचा वॉरंट रद्द होईल. आमचा त्यात काहीही संबंध नाही. मी त्यांना दोष देणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या वॉरंटवर बोलले.