भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल काय?

| Updated on: Mar 18, 2024 | 6:24 PM

नुसतं पुन्हा आलो नाही तर दोन पक्षांना फोडून आल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. २०१९ ला भाजप जिंकून येईल असा विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी दिलेल्या घोषणेवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला

मुंबई | 18 मार्च 2024 : फक्त सत्ता, खुर्चीसाठी भाजपच्या पाठित खंजीर खुपसलं…त्यावेळी भाजपचा विजय झाल्यावर लोकांनी म्हटलं… मी पुन्हा येईन म्हटलं होतं, हे आले, असं देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलं. तर नुसतं पुन्हा आलो नाही तर दोन पक्षांना फोडून आल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. २०१९ ला भाजप जिंकून येईल असा विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी दिलेल्या घोषणेवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. ‘काही जणांना दोन पक्ष फोडून पुन्हा आल्याचा अभिमान असतो, तुम्ही घरफोडे… फडणवीस यांना घरफोडीचं लायसन्स देऊन टाका. त्यामुळे आता तुमचं चिन्ह कमळ वैगरे नको तर हातोडा सारखं काहीतरी घ्या घरफोडी करण्याला लागतं ते.. सगळ्याची घरं, पक्ष तुम्ही फोडता. तुम्ही नेत्यांचे आदर्श काय…तुम्ही आदर्शवाले नेते घेतले’, असे म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधाला.

Published on: Mar 18, 2024 06:23 PM
चिंता करु नका… महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची….सख्खा भाऊ दादांच्या विरोधात केली सडकून टीका