लग्न झालं तरी माझ्यामुळेच, पोरगा झाला तरी माझ्यामुळेच, ही वृत्ती सोडा; देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला लगावला टोला?
VIDEO | अडीच वर्षांपैकी दोन वर्ष दरवाज्याच्या आतच होते, श्रेयवादावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल, बघा व्हिडीओ
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विकास कामांच्या श्रेयवादावरून माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं किंवा ते काम आमच्याच काळात झालं, असा दावा केला जात आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळापैकी ते दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतलं असं म्हणणं हस्यास्पद आहे. अन् सहा महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, सध्या अशीच प्रवृत्ती लोकांची बघायला मिळत आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता सडकून टीका केली आहे.