… तर यापुढे जनता आपल्यालाच सत्तेत ठेवणार , देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकार दीडपट जास्त जागा घेऊन निवडून येणार, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
नाशिक : पुढच्या विधानसभेपर्यंत मी काय मिळवतोय हा विचार सोडा, पद येती जातील मिळतील पण सेवा करण्याची संधी मिळाली आहे तर या अडीच वर्षामध्ये योग्य प्रकरची सेवा करून जनतेचा विश्वास कमावला, तर त्याच्या पुढे जनता आपल्यालाच सत्तेत ठेवणार आहे. सत्तेत असताना विविध पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आजचं सरकार हे गद्दारांचं नाही तर खुद्दारांचं सरकार आहे. जनतेसाठी, हिंदुत्वासाठी ज्यांची खद्दारी आहे. गद्दारांचं सरकार ते होतं जे २०१९ साली जनतेच्या पाठीत खंजीर खोपसून या राज्यात स्थापन झालं. या गद्दारांच्या सरकारमधून खुद्दार बाहेर पडले आणि हे सरकार स्थापन केलं, जे उरले सुरले १० आहेत त्यांना थांबवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशी असल्याची टीका होतेय, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Published on: Feb 12, 2023 08:12 AM