“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान दाखवून तुमचा…”, फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

| Updated on: Nov 06, 2024 | 2:41 PM

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत नागपूरमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना बंदी घालण्यात आली होती, यावरुन सवाल केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

“राहुल गांधी हे आता काँग्रेस राहिले नाहीत. त्यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली आहे. ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. ते आता कट्टरपंथी विचारधारेकडे वळले आहेत. त्यामुळेच ते ओरिजनल निळ्या रंगाऐवजी ते लाल रंगाचं कव्हर असलेली संविधानाची प्रत दाखवत असतात”, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून तुम्ही कोणाला इशारा देत आहात? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींसह महाविकासाआघाडीवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस पुढे असेही म्हणाले, ‘संविधान आणि भारत जोडोच्या नावाखाली राहुल गांधी अराजकता पसरवताय. अर्बन नक्षलवाद या पेक्षा वेगळा नाही. दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकासाआघाडी जोरदार टीका केली आहे.’ तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलवादी म्हणतात, त्यांनी चौकशी करावी, त्यांना कोणी थांबवलंय असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना आव्हान दिलंय.

Published on: Nov 06, 2024 02:41 PM
अजित पवारांकडून राष्ट्रवादीचा जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी दादांच्या ‘या’ मोठ्या घोषणा
Nilesh Rane : ‘मी अजून किती दाढी पिकवायची?’ निलेश राणेंची मिश्किल फटकेबाजी, बघा नेमकं काय म्हणाले?