देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर शरद पवार, दोन समाजाला झुंजवत ठेवलं अन्…
आतापर्यंत दोन समाजाला झुंजवत ठेवलं असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केला. ओबीसींना आरक्षणाची शिफारस करणाऱ्या मंडल आयोगाला त्यावेळच्या शिवसेनेने विरोध केला. त्यामुळेच भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
मुंबई, १७ डिसेंबर २०२३ : नागपुरातील भाजपच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शरद पवार यांच्यामुळे मराठा आरक्षण लांबलंय तर शरद पवार यांनी सर्वाधिक विरोध केल्या त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, असे फडणवीस म्हणाले. आतापर्यंत दोन समाजाला झुंजवत ठेवलं असा आरोप फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केला. ओबीसींना आरक्षणाची शिफारस करणाऱ्या मंडल आयोगाला त्यावेळच्या शिवसेनेने विरोध केला. त्यामुळेच भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले असेही फडणवीस यांनी म्हटलं. शरद पवार आणि ठाकरे गटावर हल्लाबोल करताना मराठा आरक्षणासाठी सरकारचे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहे. तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटलं. तर देवेंद्र फडणवीस ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…