पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला, नेमकं काय म्हटलं?
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि सरकारला अनेक मुद्द्यावरून घेरलं. सरकारच्या चहापानच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद घेतली
नागपुर, ६ डिसेंबर २०२३ : राज्य विधिमंडळाचे ७ डिसेंबर म्हणजेच उद्यापासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडणार आहे. त्यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि सरकारला अनेक मुद्द्यावरून घेरलं. सरकारच्या चहापानच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद घेतली. विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला. विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर आज बहिष्कार घातला. खरं म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्यावेळेस सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे ते पुढच्या वेळेस येतील, अशी शक्यता मला दिसत आहे, असे फडणवीस म्हणाले.