Gopichand Padalkar यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या ‘त्या’ टीकेवरून देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
VIDEO | भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या 'त्या' सडकून टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया बघा काय म्हणाले?
मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच एकच संतापाची लाट उसळली होती. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या अजित पवार यांच्या त्या टीकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तीनही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी, तीनही पक्षाच्या नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा बिलकूल उपयोग करु नये, असं माझं स्पष्ट मत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Published on: Sep 19, 2023 10:21 PM