लोकसभेच्या जागा वाटपासाठी फडणवीस दिल्लीत पण शिंदे नाहीत? दौरा का केला रद्द?

| Updated on: Mar 12, 2024 | 10:42 AM

विद्यमान १३ जागा तरी मिळाव्यात अशी शिंदेंची मागणी आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेला १० पेक्षा अधिक जागा देण्यास भाजप तयार नाही. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार, भाजप ३४, शिवसेना १० आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळणार?

मुंबई, १२ मार्च २०२४ : दिल्लीमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपच्या निवडणूक समितीची बैठक झाली. याबैठकीपूर्वी महायुतीचीही बैठक झाली. मात्र अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले नाहीत. महायुतीच्या जागावाटपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होती. मात्र शिंदे आणि अजित पवार दिल्लीत काही बैठकीला हजर झाले नाहीत. कमी जागा मान्य नसल्याने मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेले नसल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान १३ जागा तरी मिळाव्यात अशी शिंदेंची मागणी आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेला १० पेक्षा अधिक जागा देण्यास भाजप तयार नाही. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार, भाजप ३४, शिवसेना १० आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. आमचा सन्मान राहणार नसेल तर तुम्ही सुद्धा सन्माला मुकणार असा इशारा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी दिलाय. तर अजित पवार यांनी तिघांचा सन्मान राहिल असं जागावाटप होईल, असे म्हटले.

Published on: Mar 12, 2024 10:42 AM
भरत गोगावले यांनी टोचले संतोष बांगर यांचे कान, बघा नेमकं काय म्हणाले….
शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांचे हातवारे अन् काय ते इशारे… नुसते टिकांचे फटकारे