नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब, पत्रात स्पष्टच म्हटलं…
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहीले असून नवाब मलिक यांना युतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. “सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास...
मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका करताना भाजपने नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही कुणाच्या मांडीला मांडी लावून बसत नाही. मी फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशातच आता त्यांनी आणखी एक मोठा लेटरबॉम्ब टाकला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहीले असून नवाब मलिक यांना युतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. “सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही”, अशा शब्दांत फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.