Ajit Pawar यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानं उडाली खळबळ
VIDEO | अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. अजित दादांच्या मुख्यमंत्रिपदावरून देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केल्यानं राज्यातील प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असे फडणवीस जरी बोलले असले तरी तूर्तास एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहे, असे स्पष्टपणे म्हटले आहे. अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर फडणवीस यांनी पूर्णविराम दिलाय. ते म्हणाले, मला हे स्पष्ट करायचे की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. लोकसभा असो की विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहेत हे तुम्ही मनातून काढून टाका. मुख्यमंत्री बदलणार नाहीत, बदलणार नाहीत.