BMC निवडणूक लवकर जाहीर होणार? फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘सागर’ बंगल्यावर भाजपची बैठक
VIDEO | राजकीय घडामोडींना पुन्हा वेग, फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर भाजपची बैठक तर मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर भाजपची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील आमदार, खासदार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर ही बैठक झाली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे सागर बंगल्यावर नेमकी काय खलबतं झाली आहेत याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दोनच दिवसापूर्वा भाजपचे आमदार आशिष शेलार वर्षा बंगल्यावर हातात कागद घेऊन हजर झाले होते. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली असल्याची चर्चाही केली जात आहे. या बैठकीला प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, भारती लव्हेकर, आणि आशिष शेलार हेही या बैठकीला उपस्थित असल्याने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे.