देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, तासभर काय झाली चर्चा?

| Updated on: Oct 22, 2024 | 12:53 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास खलबतं झाली आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी या तिनही नेत्यांमधील बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. यानंतर काल फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची वर्षावर रात्री भेट घेतली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. रात्री ११ वाजून ४० मिनिटं ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. दोघांमध्ये झालेली ही चर्चा विधानसभा निवडणुकीच्या जागांसंदर्भात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, गेल्या रविवारीच भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ९९ जणांची यादी जाहीर केली. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या ९९ उमेदवारांच्या यादीत कुणाला परत उमेदवारी देण्यात आली तर काहींचा पत्ता कट केल्याचे पाहायला मिळाले. तर भाजपकडून आणखी काही नावं पक्षाकडून निश्चित केल्यानंतर भाजपची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. अशातच येत्या दोन दिवसात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.

Published on: Oct 22, 2024 12:53 PM
विधानसभेच्या तोंडावर पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
‘भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी धक्का देणारी…’, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा गौप्यस्फोट