Ladki Bahin Yojana : आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा ‘या’ महिलांना देखील मिळणार लाभ, फडणवीसांनी पुन्हा केलं स्पष्ट

| Updated on: Jul 07, 2024 | 12:40 PM

सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रूपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लभ मिळावा यासाठी महिलांची एकच धावपळ सुरू असताना आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला मिळणार हे स्पष्ट केले आहे

Follow us on

महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजना’ लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. एकदंर महिलांची धावपळ आणि येणाऱ्या अडचणी लक्षात घेता या योजनेतील सर्व अटी, शर्ती काढून टाकल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांना आता काही टेन्शन घेण्याची गरज नाही तर १५ वर्षीचं मतदान यादीतील नाव, १५ वर्षीच्या रेशन कार्डमधील नाव, १५ वर्षीच्या घराचे कागदपत्र देखील चालणार आहे. पतीच्या कागदपत्रावर पत्नीला आणि वडिलांच्या कागदपत्रांवर मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कुणालाही धावाधाव करायची गरज नाही तर ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड आहे, अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजना लागू आहे आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बघा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, कोणत्या महिलांना मिळणार लाडक्या बहीण योजनेचा लाभ?