होळीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘त्या’ वक्तव्याची आठवण, बघा काय म्हणाले?

| Updated on: Mar 07, 2023 | 2:41 PM

VIDEO | 'काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात', देवेंद्र फडणवीस यांनी कुणावर केली खोचक टीका

मुंबई : राज्यात होळीचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळत असून राजकीय वर्तुळात देखील नेत्यांनी होळीचे रंग उधळल्याचे पाहायला मिळाले. आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपने दिमाखदार होळी साजरी केली. बांद्र्यात भाजपतर्फे होळी आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला होळीनिमित्त संदेश दिला. विरोधकांचा बदला घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य करून विरोधकांवर बोचरी टीका केली. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की मी बदला घेणार. आजही त्यांनी या वक्तव्याची आठवण केली. ते म्हणाले, खूप लोकांनी तंग केलंय. मी स्वतः म्हटलं होतं, बदला घेणार. तो बदला म्हणजेच मी सगळ्यांना माफ केलंय. आमच्या मनात काहीच कटूता नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय.

Published on: Mar 07, 2023 02:41 PM
संजय राऊतजी, मनात मतभेद ठेवू नका, फक्त एवढी एक गोष्ट करा!; चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन
इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक