‘सावत्र भावांपासून सावध रहा, सख्खे भाऊ…’, ‘लाडक्या बहिणीं’ना जळगावात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'बहिणींचा आशिर्वाद आमच्या पाठिशी असेल. जो पर्यंत आमचं त्रिमूर्तींचं सरकार सत्तेत आहे. तोवर बहिणींसाठीची ही योजना कुणाचा बापही बंद करू शकत नाही', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जळगावमात महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमात ते बोलत होते.
लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही ते तुमचेच आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर सावत्र भावांपासून सावध रहा, सख्खे भाऊ तुमच्यासोबत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जळगावममधील सागर पार्कमध्ये शासनाकडून महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत देण्यात येणाऱ्या पैशांसंदर्भात भाष्य केले आहे. ‘आमचे नेते गमतीगमतीत बोलताना काहीही बोलतात, कुणीतरी म्हणतं की लाडकी बहीण योजनेचे पैस परत घेऊ. पण अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही’, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असून लाडकी योजना बंद होणार नसून पैसे मिळणार असल्याचा विश्वास महिलांना दिला. बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Published on: Aug 13, 2024 06:06 PM