Devendra Fadnavis : ‘सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता…’; देवेंद्र फडणवीसांचा MIM ला इशारा

| Updated on: Nov 10, 2024 | 12:42 PM

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमध्ये काल एक सभा झाली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ओवैसी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच महायुती आणि मविआच्या बड्या नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे एक जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एमआयएमवर हल्लाबोल करत पुन्हा एकदा वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ओवैसी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ‘छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत. ओवैसी हे छत्रपती संभाजी नगर. सुन लो ओवैसी छत्रपती संभाजीनगर…. किसी का बापभी पैदा हुआ तो ये नाम नही बदल सकता…’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी एमआयएमवर थेट निशाणा साधला तर पुढे ते असेही म्हणाले, एमआयएमच्या सभेत एका महिलेने म्हटले. हा संभाजी राजे कोण होता. हे संभाजीनगर कसे झाले. औरंग्या फितुरी झाली नसती तर कधीच संभाजी महाराज तुझ्या हाती लागले नसते.’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published on: Nov 10, 2024 12:42 PM
भाजप खासदाराचा लाडक्या बहिणींना दम, ‘आमचे 1500 घ्यायचे अन् काँग्रेसच्या रॅलीत, त्यांचे फोटो काढा, आम्ही त्यांची…’
Saamana : अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून पराभवांचं भाकीत, ‘रोखठोक’मधून नेमकं काय म्हणाले?