Maharashtra Corona : कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….

| Updated on: Dec 25, 2023 | 5:56 PM

Maharashtra Corona Update गेल्या 24 तासांत 628 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 डिसेंबरपर्यंत देशात कोरोनाच्या JN.1 प्रकाराची एकूण 63 प्रकरणे समोर आल्याची माहिती मिळतेय. तर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होताना दिसताय. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ने देखील देशात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 628 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 डिसेंबरपर्यंत देशात कोरोनाच्या JN.1 प्रकाराची एकूण 63 प्रकरणे समोर आल्याची माहिती मिळतेय. तर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाची पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्याची स्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कुठल्याही प्रकारचा सामना करायला आपण तयार आहोत. मात्र आपण अपेक्षा करू की त्याचा फार प्रादुर्भाव वाढणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 25, 2023 05:55 PM
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत सर्वात मोठं आंदोलन, कसा असणार उपोषणाचा प्लॅन?
Merry Christmas 2023 : मुंबईतील वांद्र्याच्या माऊंट मेरी चर्चमध्ये कसा आहे नाताळचा उत्साह?