राजीनामा अन् राजकारणातून संन्यास… देवेंद्र फडणवीसांची टोकाची भाषा; आरक्षणावर थेट बोलले
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोध देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. जर मी आरक्षणाच्या निर्णयात अडथळा आणला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावं… तसं झाल्यास राजीनामा देऊन निवृत्ती घेणार, असं वक्तव्यच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा आणि निवृत्तीच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास मोठा वाटा आहे, त्यामुळे त्यांना मराठा विरोधी म्हणणं चूक आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशाराच दिला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आयुष्यातील मोठा फटका देवेंद्र फडणवीस यांना बसेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Published on: Aug 20, 2024 11:00 AM