“…तर मी राजीनामा देऊन संन्यास घेईन”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 19, 2024 | 6:04 PM

आरक्षणात मी अडथळा आणला असं मुख्यमंत्री एकनथ शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. “एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी थांबवत आहेत”, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केला. या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. पुढे ते असेही म्हणाले, आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले. माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी केले आणि शिंदेंच्या पाठीशी मी भक्कमपण उभा राहिलो आहे. मी पुन्हा सांगतो जर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी तो निर्णय होऊ दिला नाही, त्याचक्षणी मी राजीनामा देईन. तसेच राजकारणातून संन्यासही घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published on: Aug 19, 2024 06:04 PM
सबसे कातिल गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल अन् आता…, नेमकं प्रकरण काय?
अजित पवार अन् सुप्रिया सुळेंमध्ये रक्षाबंधनालाही दुरावा, ताईंनी दादांना राखी बांधलीच नाही