देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण? एसआयडीचा गोपनीय रिपोर्टमधून मोठी माहिती समोर

| Updated on: Nov 01, 2024 | 6:17 PM

देवेंद्र फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

सआयडीच्या गोपनीय रिपोर्टमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा अलर्टवर असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. गुप्तहेर संस्थेने दिलेल्या एका सूचनेनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांना थ्रेट असल्यानं त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ कऱण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर फोर्स वन या विशेष पोलिसांच्या पथकाच्या बारा जवानांची अतिरिक्त टीम तैनात करण्यात आली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली असून देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर फोर्स वन या पोलिसांच्या विशेष पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. मात्र एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा अलर्टवर आहे.

Published on: Nov 01, 2024 06:17 PM
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, बानवकुळेंसोबत मॅरेथॉन बैठका अन्….
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, अजित पवारांच्या बंडानंतर नात्यात फूट अन्….