तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडलं, फडणवीसांची सडकून टीका

| Updated on: May 17, 2024 | 9:31 PM

'मोदींच्या नेतृत्वात जी महायुती तयार झाली आहे. मुंबईत दहा वर्षात परिवर्तन पाहिलं. ते परिवर्तन आम्ही सांगतो. मुंबईचा बदललेला चेहरा सांगतो. मेट्रो, अटल सेतू, धारावीचा विकास आम्ही सांगतो... इंडिया आघाडीवाल्यांनो तुम्ही काय सांगू शकता. तुम्ही एक तरी काम दाखवा. ', फडणवीसांचा हल्लाबोल

महायुतीकडून आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेबांची गर्जना आठवते. ते म्हणायेच… माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यांनी सांगितलं हे चालणार नाही. ते बदला. तेव्हापासून त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलं. ही शोकांतिका आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, बाळासाहेबांची सभा व्हायची…शिवशाहीचा भगवा झेंडा… कडवट हिंदू असं म्हटलं जायचं. आदर्श , शिवरायांचे मावळे असे शब्द ऐकायला मिळायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझं कुटुंब माझी जबाबदारी यापलिकडे काही ऐकायला येत नसल्याचे म्हणत फडणवीसांनी जिव्हारी लागणारी टीका केली.

Published on: May 17, 2024 09:30 PM
त्यामुळे आता मला पाठींबा द्या, अभिजीत बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
नेहरुंनतर नरेंद्र मोदी तिसरे पंतप्रधान बनणार, राज ठाकरेंची ‘शिवतीर्था’वरून थेट घोषणाच