Amruta Fadnavis : नागपुरात गरबा महोत्सवाला अमृता फडणवीस यांनी घेतला उखाणा; म्हणाल्या, देवेंद्र सारखे रत्न…

| Updated on: Oct 22, 2023 | 10:55 AM

VIDEO | नागपूर मधील अंबाझरी हील टॉप नऊ दुर्गा मंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवीची आरती केली आणि यानंतर उखाणा घेत सर्वांचे लक्ष वेधले आहे. बघा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी कोणता उखाणा घेतला.

नागपूर, २२ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शनिवारी नागपूर शहरातील दुर्गा मंडळांना भेटी दिल्या. नागपूर मधील अंबाझरी हील टॉप नऊ दुर्गा मंडळात अमृता फडणवीस यांनी देवीची आरती केली. यावेळी अमृता फडणवीस यांनी स्पर्धेतील विजेत्या महिलांना पुरस्कार वितरण केले. या कार्यक्रमादरम्यान, अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उखाणा देखील घेतला. अमृता फडणवीस म्हणाल्या, मला नागपूर शहरातील दुर्गा मंडळात सहभागी व्हायला आवडते त्यामुळे मी दरवर्षी न चुकता मंडळांना भेट देते. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नाही तर राज्याच्या भल्यासाठी देवीला जोगवा मागत असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. बघा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी कोणता उखाणा घेतला.

Published on: Oct 22, 2023 10:44 AM
मनोज जरांगे पाटील यांची पुढची रणनीती काय? अल्टिमेटमचे काहीच तास शिल्लक
आझाद मैदानात रावणदहन दसऱ्यालाच होणार, मग शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार?