जेणेकरून ते शांत होतील, संजय राऊत यांच्या आरोपांवर अमृता फडवणवीस यांनी काय लगावला टोला
VIDEO | संजय राऊत यांच्यासाठी चांगलं औषध बनवा, असं का म्हणाल्या अमृता फडवणवीस; संजय राऊत यांच्या आरोपांवर अमृता फडवणवीस यांचा खोचक टोला
ठाणे : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि समाजसेविका अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर भाष्य करताना संजय राऊत यांना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. अमृता फडवणवीस ठाण्यातील जेनेरिक औषधांच्या नवीन उत्पादनाच्या उद्धाटनाला आल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या मी सांगेन संजय राऊत यांच्यासाठी चांगलं औषध बनवा जेणेकरून ते शांत होतील आणि महाराष्ट्रात शांती राहील. तसेच आपल्या महाराष्ट्रातील एकमेकांवरील दगडफेक थांबेल, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on: Feb 21, 2023 07:23 PM