आधी मुख्यमंत्रिपदाची ऑफर, आता शेकहँड… विधानसभेत एकनाथ शिंदे-नाना पटोलेंची भेट, काय झाली दोघांत चर्चा?

| Updated on: Mar 20, 2025 | 12:37 PM

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची भेट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिंदेंना ऑफर दिली होती. त्यानंतर आज शेकहँड केल्याचे दिसतंय

मुंबईत विधिमंडळांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशातच विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आज सभागृहात जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांची भेट झाली. त्यांच्या भेटीची दृश्य सध्या सोशल मीडियावरही समोर आली आहेत. विधानभवन परिसरात दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले असून त्यांच्यात आरोप प्रत्यारोप विधानभवन परिसरातच घोषणाबाजी आणि फलकांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. विधानसभा परिसरात एकनाथ शिंदे आणि नाना पटोलेंची भेट होताच त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिला आणि शेकहँड केल्याचेही पाहायला मिळाले. यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे आणि नाना पटोले समोरा-समोर आल्यानंतर त्यांनी हातमिळवणी केली यावेळी त्यांच्यात काही गप्पा देखील झाल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून दिसून येतंय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदासाठी ऑफर दिली होती. त्यामुळे आज विधानभवन परिसरात झालेल्या हातमिळवणीचा नेमका अर्थ काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

Published on: Mar 20, 2025 12:37 PM
Satish Bhosale : सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत खोक्याची रवानगी
Bank Strike Video : बँकांची काम असतील तर आजच करून घ्या, पुढील चार दिवस बँका बंद; कारण…