Eknath Shinde : “याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”, एकनाथ शिंदे यांचा कोणाला खोचक टोला?
ठाकरे-फडणवीस भेटीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली.
सध्या राज्यात सुरू असलेल्या विधानपरिषदेचं हिवाळी अधिवेश नागपुरात सुरू आहे. या अधिवशेनात काल मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये साधारण 15 मिनिट चर्चा झाली. ठाकरे-फडणवीस भेटीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली. पुढे ते असेही म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना विरोधी पक्षही भेटतो. विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात. पण मी हे चित्र पाहिल्यानंतर टोकाची टीका करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये लोकसभेच्या निकालानंतर हुरळून जाणाऱ्यांमध्ये एक आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांना भेटणं गैर नाही. पण याला भेट, त्याला भेट आणि दुसर्या दिवशी घरी थेट अशी ही परंपरा आहे, असं वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे हे सध्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी गेले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिंदेंनी ही खोचक प्रतिक्रिया दिली.