अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकणात मोठी अपडेट, बघा कोणती माहिती आली समोर

| Updated on: Mar 17, 2023 | 3:13 PM

VIDEO | अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकणात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर डीसीपी अमर जाधव यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकणात महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी अनिक्षाचे वडील अनिल जयसिंधानींना यापूर्वी दोनदा अटक करण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, २००४ आणि २००९ मध्ये तत्कालीन डीसीपी अमर जाधव यांच्याकडून अनिक्षाचे वडील अनिल जयसिंधानींवर कारवाई करण्यात आली होती. तर अनिल जयसिंधानींवर झालेल्या कारवाईनंतर अमर जाधवांवर खंडणीचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान या प्रकऱणात चौकशीत काही सिध्द न झाल्यामुळे अमर जाधव हे निर्दोश असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकणात काही माजी अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता. या आरोपानंतर अमर जाधव यांनी यांचे स्पष्टीकरण दिले आहे.

Published on: Mar 17, 2023 03:12 PM
गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब, कधी होणार युक्तिवाद?
कावळा कोकिळावर नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…