मृत वाघिणीच्या बछड्यांवर आता राहणार 60 ट्रॅप कॅमेऱ्याची नजर
वाघिणीच्या अकरा महिन्यांच्या दोन बछड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ६० कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. पाच ते सहा वर्षे वयाची वाघिणी टी- ३५ मृतावस्थेत दोन दिवसांपूर्वी आढळली होती.
पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सालेघाट वन्यजीव वनपरिक्षेत्रातील दोन बछड्यांची माता असलेल्या वाघिणीचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि न्यायवैद्यक अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, या वाघिणीच्या अकरा महिन्यांच्या दोन बछड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ६० कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. पाच ते सहा वर्षे वयाची वाघिणी टी- ३५ मृतावस्थेत दोन दिवसांपूर्वी आढळली होती.