VIDEO : Sharad Pawar | १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस, कारण माझ्या आईचाही वाढदिवस- शरद पवार

| Updated on: Dec 12, 2021 | 2:30 PM

शरद पवार भाषणामध्ये बोलताना म्हणाले की, १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे.  कारण आज माझ्या आईचाही वाढदिवस आहे. पुढे शरद पवार म्हणाले मी 50 वर्षांचा झालो तेव्हा विदर्भातील लोकांनी पुढाकार घेतला आणि माझा वाढदिवस झाला. 61 वर्षांचा झालो, तेव्हा भुजबळांनी पुढाकार घेऊन वाजपेयींच्या उपस्थित वाढदिवस झाला.

शरद पवार भाषणामध्ये बोलताना म्हणाले की, १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे.  कारण आज माझ्या आईचाही वाढदिवस आहे. पुढे शरद पवार म्हणाले मी 50 वर्षांचा झालो तेव्हा विदर्भातील लोकांनी पुढाकार घेतला आणि माझा वाढदिवस झाला. 61 वर्षांचा झालो, तेव्हा भुजबळांनी पुढाकार घेऊन वाजपेयींच्या उपस्थित वाढदिवस झाला. 75 वर्षांचा झालो तेव्हा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थित हा कार्यक्रम दिल्लीत झाल्याचं त्यांनी सागितलं. साधारणतः लक्षात घेतलं असेल 50, 61 आणि 75 या तीन वाढदिवसाला विशिष्ट प्रसंगानिमित्ताने वाढदिवस आयोजित केला होता. पण 81 आणि 82 ला कार्यक्रम आयोजित करणं मला पटलेलं नव्हतं. पण पक्षाचे आदेश आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला. तुम्ही सर्वांनी आयोजन केलं.

VIDEO : Devendra Fadnavis | सरकारी भरतीचा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही- फडणवीस
VIDEO : Sharad Pawar Birthday | शरद पवार यांच्यावर वैचारिक हल्ले झाले पण त्यांनी संयम ठेवला : छगन भुजबळ