EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान

| Updated on: Nov 30, 2024 | 4:29 PM

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. पण यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक मतं मिळाल्याने राज्यभरात ईव्हीएम मशीनवर विरोधक आक्षेप घेत असताना आता मारकडवाडी येथे ३ डिसेंबर रोजी होणार बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याची मागणी मतदारांनी केली आहे. राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते EVM मशीनच्या विरोधात भूमिका मांडत असून आक्षेप घेत आहे. तर दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. मारकडवाडी येथे ३ डिसेंबर रोजी होणार बॅलेट पेपरवर चाचणी घेण्याचा ठराव मंजूर झाला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. पण यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार याना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे .

Published on: Nov 30, 2024 04:29 PM
राज्यात ‘मी पुन्हा येईन…’, 5 डिसेंबरला ‘या’ ठिकाणी नव्या सरकारचा शपथविधी; भाजपची जोरदार तयारी अन्…
‘लोकशाहीचं वस्त्रहरण, EVM मध्ये घोटाळा?’, ‘या’ मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण