अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा; ‘या’ आमदारानं केली मागणी
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत केली. समस्त हिंदूंना अभिमान वाटावा असा दिवस म्हणजे अयोध्येत राम मंदिराचं उद्धाटन 22 जानेवारीला होणार
नागपूर, १५ डिसेंबर २०२३ : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत केली. समस्त हिंदूंना अभिमान वाटावा असा दिवस म्हणजे अयोध्येत राम मंदिराचं उद्धाटन.. येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यापार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात प्रताप सरनाईक यांनी मोठी मागणी केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी एक निवेदन दिले आणि सभागृहामध्ये सुद्धा विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाने जे वर्षामध्ये एवढ्या सुट्ट्या जाहीर केल्यात त्यातील एक सुट्टी रद्द करून पुढल्या वर्षी 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करावी जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांना या महाराष्ट्रातील जनतेला हा सोहळा अनुभवता येईल, जर आपण सुट्टी जाहीर केली तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल अशी विनंती केली आहे.’ असे त्यांनी म्हटले.