मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला वंचितने प्रस्ताव दिलाय. ज्यामध्ये जरांगे पाटील यांना जालन्यातून महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून घोषित करा, अशी मागणी करण्यात आली. यासह २७ जागांची मागणी वंचितकडून करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने महाविकास आघाडीसमोर मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवलाय. लोकसभेच्या जागावाटपाच्या जागेवरून मुंबईत महाविकास आघाडीची शेवटची बैठक झाली. ज्यात मनोज जरांगे पाटलांना जालना लोकसभा मतदारसंघातून मविआकडून उमेदवारी जाहीर करा, असा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. यासोबतच वंचित आघाडीकडून एकूण ४८ पैकी २७ जागांची मागणी करण्यात आली आहे. तर मविआच्या उमेदवारांमध्ये १५ ओबीसी आणि ३ अल्पसंख्यांक असावेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, मराठ्यांच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर माझ्या सोबत आहेत. मात्र सध्या माझ्या समोर मराठा आरक्षण हा मुद्दा आहे. राजकारण माझा अजेंडा नाही.