Pune | जेजुरीच्या खंडोबाला दिले पांडुरंगाचे वैष्णव रूप, लोढा परिवाराकडून गाभाऱ्याची सजावट
जेजुरी खंडोबा देवाला श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी प्रमुख ट्रस्टी उद्योजक डॉ. राजकुमार आणि महावीर लोढा परिवारच्या वतीने खास पांडुरंगाच्या रूपातील पगडीचा साज घालून देवाचे शैव वैष्ण्विक रूप देण्यात आले. (Decoration of Khanderaya's gabhara at Jejuri fort by Lodha family)
जेजुरी : आषाढी वारीच्या आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावरून जाणारा अभूतपूर्व वैष्णवाचा संतसाहित्याची परिक्रमा असलेला हा मेळा येत असतो. मल्हारीच्या दारी याच्या पवित्र आनंद उत्सवाच्या आठवणीनिमित्त जेजुरी खंडोबा देवाला श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी प्रमुख ट्रस्टी उद्योजक डॉ. राजकुमार आणि महावीर लोढा परिवारच्या वतीने खास पांडुरंगाच्या रूपातील पगडीचा साज घालून देवाचे शैव वैष्ण्विक रूप देण्यात आले. तर भंडारा आणि बुक्क्याचा अभिषेकही माजी धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख राजकुमार लोढा विद्याताई लोडा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देशावरील कोरोना संकट नाहीसे होण्याकरीता देवाला साकडे घालण्यात आले.