पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तिरंगी रंगाची सजावट, बघा नेत्रदिपक आरास

| Updated on: Aug 15, 2023 | 4:44 PM

VIDEO | प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरापैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांनी आणि पानांनी सजावट

पंढरपूर, १५ ऑगस्ट २०२३ | देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र मंदिरं आणि १२ ज्योतिर्लिंग मंदिरात देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. असेच प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरापैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांनी आणि पानांनी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये शेवंती, कामिनी, और्केड कारनिशन, झेंडू अशा विविध दोन टन फुलांचा आणि पानांचा वापर करुन देवाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप, रुक्मिणी माता गाभारा तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे. तर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत होते. बघा नेत्रदिपक सजावट…

Published on: Aug 15, 2023 04:43 PM